Type Here to Get Search Results !

पारनेर - जखणगांवच्या उपसरपंचपदी किसनराव कर्डिले यांची बिनविरोध निवड


 

जखणगांवच्या उपसरपंचपदी किसनराव कर्डिले यांची बिनविरोध निवड 

आरोग्यदायी गांव म्हणून राज्यात ओळख असणाऱ्या जखणगांव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जागा स्नेहा काळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाली होती.

या पदासाठी सदस्यांमधुन निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

या पदासाठी किसनराव भाऊसाहेब कर्डिले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी सरपंच डॉ सुनिल गंधे, चेअरमन बाळासाहेब कर्डिले, ग्रामसेवक प्रविण पानसंबळ, बाळकृष्ण कर्डिले,सुरेश कारले,बाळु काळे, राजेंद्र भीसे, प्रगती कर्डिले, स्नेहा काळे,अनिता हाडोळे, सुनिल धिरवडे,रमेश आंग्रे,हलीम शेख, संजय वैराळ, भाऊसाहेब कर्डिले, संदीप गवळी,तात्या कर्डिले यांचेसह ग्रामपंचायत व सेवा सोसायटी चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

किसनराव कर्डिले यांच्या निवडीबद्दल त्यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.