Type Here to Get Search Results !

राहुरी - दारू पिण्यास ३०० रुपये दिले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण.


 


दारू पिण्यास ३०० रुपये दिले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण.


राहुरी प्रतिनिधी,

दारू पिण्यास तीनशे रुपये दिले नाही म्हणून आरोपीने बाळासाहेब पडागळे यांना शिवीगाळ करून लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दि. ५ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली.


बाळासाहेब जयवंत पडागळे, वय ३६ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बाळासाहेब पडागळे व त्यांचा भाऊ मच्छिंद्र पडागळे हे दोघे राहुरी फॅक्टरी येथील चौकांमधील हाँटेल रॉयल टी सेंटर येथे चहा पिण्यासाठी गेले होते. 


त्यावेळी तेथे आरोपी आला व मला म्हणाला की, मला दारु पिण्यासाठी ३०० रुपये दे. तेव्हा बाळासाहेब पडागळे त्याला म्हणाले कि, माझ्याजवळ पैसे नाहीत. असे म्हणालेचा त्यास राग आल्याने त्याने मला शिवीगाळ केली. तेव्हा पडागळे हे त्याला काही न बोलता घरी निघुन गेले. त्यानंतर आरोपी पुन्हा काही वेळाने पडागळे यांच्या घरी गेला आणि म्हणाला की, बाळासाहेब पडागळे यास मी मारुन टाकणार आहे.


तेव्हा बाळासाहेब पडागळे त्यास म्हणाले की, तु मला का मारणार आहे, असे विचारले असता आरोपीने पून्हा शिवीगाळ करुन लाथा बुक्यानी मारहाण केली. त्यावेळी झटापटीत आरोपीने बाळासाहेब पडागळे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन ओढुन घेतली. तसेच शर्टच्या खिशातील १ हजार ५०० रुपये बळजबरीने काढुन घेवुन पळुन गेला.


घटने नंतर बाळासाहेब जयवंत पडागळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिल भिमराज पवार, रा. प्रसादनगर, ता. राहुरी, याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५४५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११९ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.