Type Here to Get Search Results !

राहुरी - गोडाऊन किपर शिवाजी शिंदे याची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करणार- भालेराव.

 



गोडाऊन किपर शिवाजी शिंदे याची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करणार- भालेराव.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील शासकीय गोदाम किपर शिवाजी शिंदे तसेच एम डी डोळस यांनी मनमानी करुन लोकांना दादागिरी करुन दमदाटी केल्या संदर्भात त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यमुना भालेराव यांच्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, यमुना भालेराव या दि. ४ मे २०२५ रोजी तहसिल कार्यालय समोरुन जात असतांना शासकीय धान्याचे गोदामासमोर शासकीय माल वहातुक गाड्या हया क्रॉस करुन गाड्या भरत होत्या. त्यामुळे भालेराव तेथे जाऊन शुटींग केली व संबंधीत हमाल यांना विचारणा केली, की येथे शासकीय अधिकारी नाही गोडावून किपर नाही. तुम्हाला गाड्या हया क्रॉस लावता येत नाही. तुम्हाला केदार साहेबांनी क्रॉस गाडया लावण्यास मनाई केली आहे. 


तेव्हा तेथील आढाव नामक हमाल याने शिंदे किपर यांना फोन केला. व आढाव याने भालेराव यांना सांगितले की, शिंदे साहेबांचा फोन आहे. तेव्हा भालेराव यांनी आढाव याचा फोन घेतला. तेव्हा शिवाजी शिंदे यांनी यमुना भालेराव यांना सांगितले की, तुम्ही शुटींग का करता तुम्हाला काय अधिकार आहे शुटींग करण्याचा. 


तेव्हा शिवाजी शिंदे मला म्हणाले की मी नगर मध्ये आहे. तेथे असतो तर तुमचा ही मोबाईल घेतला असता, आम्हाला गाड्या कशा भरायच्या आहेत, ते आम्ही बघु. त्यामुळे भालेराव यांनी गाड्याची शुटींग काढुन केदार साहेब यांना फोन केला व त्यांना झालेला प्रकार सांगितला आहे. 


तेथे एम डी डोळस हे नाही, गोडावुन किपर नाही. फक्त हमाल क्रॉस गाड्या भरत होते. त्यांची सुध्दा मनमानी चालु आहे. त्यामुळे एम डी डोळस हटाव व शासकीय गोडावुन बचाव, तात्काळ हे शासकीय अधिकारी शिवाजी शिंदे कामचुकार याची तात्काळ चौकशी व्हावी. 


गाड्या भरतांना हे कोणी हजर का नव्हते, याची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही होऊन अहवाल प्राप्त व्हावा. हे झाले नाही तर तहसिल कार्यालयापुढे त्या संदर्भात आंदोलन करण्यात येईल. काही आंदोलनाच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास आपण जबाबादार राहाल ही नोंद घेण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.