Type Here to Get Search Results !

पारनेर - ढोकेश्वर विद्यालयाचा बारावीचा निकाल 94.90 टक्के - ढोकेश्वर विद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेत अथर्व थोपटे प्रथम


 



ढोकेश्वर विद्यालयाचा बारावीचा निकाल 94.90 टक्के


ढोकेश्वर विद्यालयात बारावी बोर्ड परीक्षेत अथर्व थोपटे प्रथम


 ढोकेश्वर विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर  येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चि.अथर्व थोपटे याने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत 81 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित श्री ढोकेश्वर विद्यालयाचा बारावी शास्र शाखेचा निकाल 94.90 टक्के लागला असून बारावी कला शाखेचा निकाल 72.72 टक्के लागला आहे. शास्र शाखेत एकूण 216 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते तर त्यापैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कला शाखेत एकूण 89 विद्यार्थी प्रविष्ठ  झाले तर त्यापैकी 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 शास्र शाखेत चि.अथर्व बाळासाहेब थोपटे (81%) प्रथम,  चि. ऋषिकेश अशोक जाधव (72.33%) द्वितीय, कु. वेदिका गणेश ठाणगे (70%) तृतीय, कु. प्रणिती अशोक गांगड (69.83%) चतुर्थ तर कु. सुहानी सुजित झावरे(68%) ही पाचवी आली आहे.

कला शाखेत कु. रुकैय्या कासम मोमिन (70.67%) प्रथम, कु. बारकबाई दत्तोबा तिखोळे (69%) द्वितीय, कु. अंजली छबू रोकडे (67%) तृतीय, कु. कोमल तुळशीराम उमाप  (65.17%) चतुर्थ तर कु. रुकुय्या बशीर शेख (64.67%) पाचवी  आली.

   या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अशोक गांगड, विजय  सोबले, गोवर्धन मते, शिवाजी नरसाळे, योगेश मांडगे, अशोक वाघ, राजेंद्र ढोणे, आतिष झावरे, सचिन महानवर, भाऊसाहेब हिंगडे, नितीन ढोकळे, भाऊसाहेब खोसे, अनिकेत बांगर, सुवर्णा दिघे, रामदास नरवडे, मिना खाडे, सिमा खोसे, धनश्री निवडुंगे इत्यादी प्राध्यापकांनी वर्षभर मार्गदर्शन केले.

  विद्यालयाच्या या यशाबद्दल

 संस्थेचे अध्यक्ष मा.रामचंद्र दरे साहेब, उपाध्यक्ष मा.डॉ. विवेकजी भापकर, सचिव मा.ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा. श्री. जयंतजी वाघ साहेब, खजिनदार मा. ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम व  संस्थेचे जेष्ठ विश्वस्त व माजी अध्यक्ष मा. नंदकुमारजी झावरे पाटील, ज्येष्ठ विश्वस्त मा. जी. डी. खानदेशे साहेब, मा. सिताराम अण्णा खिलारी सर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी, प्राचार्य सुनिल वाव्हळ, पर्यवेक्षक बाळासाहेब खिलारी, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब निवडुंगे, टाकळी ढोकेश्वर परिसरातील शिक्षण प्रेमी पालक, विद्यार्थी  यांनी अभिनंदन केले.