प्रविण भुसाळ यांना मारहाण करून सोन्याची अंगठी व रोख रक्कम काढून घेतली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तुम्ही आमच्या तळ्यातुन माती घेउन चालले आहात, त्याचे पैसे दया, असे म्हणून आरोपींनी प्रविण भुसाळ यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तांदुळनेर शिवारात घडली.
प्रविण गोरक्षनाथ भुसाळ, वय ३६ वर्षे, रा. तांदुळनेर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रविण भुसाळ हे ट्रॅक्टरमधुन गावातील तळ्यातुन माती घेउन जात होते.
त्यावेळी तेथे आरोपी आले व म्हणाले की, तुम्ही आमच्या तळ्यातुन माती घेउन चालले आहात, त्याचे पैसे दया, तेव्हा प्रविण भुसाळ त्यांना म्हणाले की, तळ्यातुन माती काढण्यासाठी शासकीय परवानगी आलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला पैसे देणार नाही.
असे म्हणालेचा त्यांना राग आल्याने त्या दोघांनी प्रविण भुसाळ यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या हाथातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व खिशातील ५ हजार रुपए काढुन घेतले. आणि पुन्हा तळ्यातुन माती काढली तर तुला सोडणार, अशी धमकी दिली.
प्रविण गोरक्षनाथ भुसाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश पाडुरंग साबळे, रा. तांदुळनेर, ता. राहुरी, व एक अनोळखी इसम अशा दोन जणांवर गुन्हा रजि. नं. ६५७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११९ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
