Type Here to Get Search Results !

पारनेर : भ्रष्ट कामांची चौकशी होत असल्यास पोटसुळ का : विक्रम कळमकर

 भ्रष्ट कामांची चौकशी होत असल्यास पोटसुळ का : विक्रम कळमकर 



पारनेर : ता. प्रतिनिधी 


पारनेर तालुक्यात मग्रारोहयोअंतर्गत घेण्यात आलेल्या कामांना तहसिलदार पारनेर यांनी दिलेल्या प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशानुसार रस्ता कॉँक्रिटीकरण करण्याची कामे मोठया प्रमाणात घेण्यात आली. ही कामे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकी दरम्यान मंजूर करण्यात आली होती. सदरहू कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. याबाबत आमदार महोदयांनी रोहयो मंत्री यांचे कडे तक्रार केली होती. सदर पत्राची शासन स्तरावर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तहसिलदार पारनेर यांनी सदर कामे करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कार्यान्वयीन यंत्रणा देण्याऐवजी जाणीवपूर्वक सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग पारनेर यांना कार्यान्वयीन यंत्रणा देण्यात आली. सदर चौकशी मध्ये दुध का दुध पाणी का पाणी होईल. गैरव्यवहार झाला नसल्यास कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांचे आर्थिक हितसंबंध या कामांशी आहेत तेच तालुक्यात आमदार साहेब विकासकामे थांबवत असल्याची टीका करत आहेत. राहिला प्रश्न विकासकामांचा तर विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीवर आमदार महोदय हे स्वत सदस्य असल्याने मोठ्या प्रमाणावर रोहयो कामे आपले मतदारसंघात होणार आहेत. विकासकामांच्या आडून कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आमदार महोदयांनी केलेल्या तक्रारींच्या मागचा उद्देश हा कामे दर्जेदार व्हावे हा आहे. भ्रष्ट कामांची चौकशी होत असल्यास विरोधकांना दुख: का होत आहे. विरोधक वस्तुस्थिती मांडण्याऐवजी जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. जनतेला सर्व माहित आहे.