पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणून संजय साळकर व त्यांच्या कुटुंबाला मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तु आमच्या विरुध्द पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार बारा वाजे पर्यत मागे घे, असे म्हणून आरोपींनी संजय साळकर व त्यांच्या कुटुंबाला काठीने व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. ११ जून रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे घडली.
संजय बाळासाहेब साळकर, वय ५५ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील डुकरेवाडी येथे राहतात. त्यांचा भाऊ बाप्पुसाहेब शेजारी राहत असुन दोघांत शेतीबाबत राहुरी कोर्टात केस चालु आहे. शेतीचे कारणावरुन संजय साळकर यांनी त्याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दि. ११ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास संजय साळकर हे सात्रळ येथे दुध घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले व म्हणाले की, तु आमच्या विरुध्द पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार बारा वाजे पर्यत मागे घे, नाही तर तुझा मर्डर करुन टाकीन. असे म्हणुन आरोपींनी त्यांना काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी संजय साळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका मोटारसायकलची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच तुम्ही जर पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घेतली नाही तर तुम्हाला एक एकाला जिवंत मारुन टाकीन, अशी धमकी दिली.
संजय बाळासाहेब साळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी स्वाती किशोर तळेकर, माई गोवर्धन साळकर, छकुली महेश साळकर, महेश बापुसाहेब साळकर, गोवर्धन बापुसाहेब साळकर, बापुसाहेब बाळासाहेब साळकर, तृप्ती किशोर तळेकर, सर्व रा. डुकरेवाडी, सात्रळ, ता. राहुरी, यासातजणांवर गुन्हा रजि. ६६०/२०२५ भारतीय न्याय संहिता ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (१), ३२४ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
