Type Here to Get Search Results !

राहुरी - तुम्ही या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणुन नणंद भावजयला बेदम मारहाण.

 तुम्ही या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणुन नणंद भावजयला बेदम मारहाण. 



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


हा रस्ता आमच्या मालकीचा आहे, तुम्ही या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणून आरोपींनी दोन महिलांना शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दि. ११ जून रोजी ८.३० वाजे दरम्यान घडली. 


अलका किशोर तळेकर, वय ३३ वर्षे, रा. माळेवाडी, सात्रळ, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे कि, दि. ११ जून २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अलका तळेकर व त्यांची भावजय या दोघी घरासमोर गायांना चारा टाकत असताना तेथे आरोपी आले व म्हणाले कि, हा रस्ता आमच्या मालकीचा आहे, तुम्ही या रस्त्याने जायचे नाही. तेव्हा अलका तळेकर त्यांना म्हणाल्या की, हा रस्ता सामाईक आहे. 


याचा राग आल्याने आरोपींनी अलका तळेकर व त्यांच्या भावजयला शिवीगाळ दमदाटी करुन कुऱ्हाडीचा दांडा, कोयत्याची मुठ व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही रस्त्याने जायचे नाही, तुम्ही जर रस्त्याने गेले तर तुमचे कोयत्याने तुकडे करुन तुम्हाला जिवे ठार मारु, अशी धमकी दिली. 


घटने नंतर अलका किशोर तळेकर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी प्रतिप संजय साळकर, अनिता संजय साळकर, सुजाता कपिल लांडगे, भावना प्रदिप साळकर, सर्व रा. माळेवाडी, सात्रळ, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६६१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.