Type Here to Get Search Results !

राहुरी - घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

 घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत सासरच्या चार लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


साधना गणेश जाधव, वय २७ वर्षे, रा. नांदगाव, पो. शिंगवे, ता. नगर, हल्ली रा. उंबरे, ता. राहुरी, या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साधना जाधव हिचे लग्न दि. ६ मे २०१८ रोजी गणेश जाधव याच्याशी झाले होते. लग्नानंतर सुमारे एक वर्षे सासरच्या लोकांनी साधना जाधव हिला व्यवस्थित नांदवीले. 


त्यानंतर सासरचे लोक वेळोवेळी म्हणत की, तुला स्वयंपाक येत नाही, तुला काम जमत नाही, तु काही कामाची नाही. असे म्हणुन त्यांनी साधना जाधव हिला वेळोवेळी मारहाण करुन मानिसक त्रास देवुन शारीरीक व मानसिक छळ करत राहीले. आपल्याला घर बांधायचे आहे, तु तुझ्या आई वडीलांकडुन घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये घेवुन ये. ते आणले नाही तर घरी येवुन नको, असे म्हणत घाण-घाण शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण करुन घराचे बाहेर काढून दिले.


घटने नंतर साधना गणेश जाधव या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी गणेश रमेश जाधव, रमेश महादेव जाधव, उषा रमेश जाधव, सोनाली महेंद्र संसारे, रा. नांदगाव, ता. नगर, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६६२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५१ (२), ३५२, ८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.