सामायिक बांधावरील ६० पोल चोरुन नेले, पाच जणांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे सामायिक बांधावर लावलेले ६० लोखंडी पोल चोरून नेल्याची घटना दि. १३ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेबाबत पाच जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लता मारुती रांधवने, वय ६१ वर्षे, रा. वार्ड नं. ७ श्रीरामपुर, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लता रांधवने यांनी दि. १२ जून २०२५ रोजी सकाळी तहसीलदार राहुरी यांचे आदेशाने त्यांच्या राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथील शेतात सशुल्क पोलीस बंदोबस्तासह शेतीची मोजनी करून सामाईक बांधावर ६० लोखंडी पोल रोवले होते.
दि. १३ जून रोजी सकाळी सदर सामाईक बांधावर रोवलेले ४२ हजार रुपए किंमतीचे ६० लोखंडी पोल चोरीस गेल्याचे दिसून आले. लता मारुती रांधवने यांनी राहुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.
त्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानदेव रभाजी शिंदे, सुमनबाई ज्ञानदेव शिंदे, दिगंबर ज्ञानदेव शिंदे, अरुण अनंदा शेलार, रा. वांबोरी तसेच करण कैलास बर्डे, रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी, या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. ६६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
