Type Here to Get Search Results !

राहुरी - काही कारण नसताना मायलेकाला फायटरने मारहाण

 काही कारण नसताना मायलेकाला फायटरने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


काही एक कारण नसताना आरोपीने दोघा माय लेकाला शिवीगाळ करुन लोखंडी फायटरने मारहाण केली. तसेच त्यांचे छप्पर पाडुन नुकसान केल्याची घटना दि. ११ जून रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे घडली. 


ताराबाई रामदास माळी, वय ६० वर्षे, रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान ताराबाई माळी ह्या पिंपळगाव फुणगी येथील चौफुलीवर गेल्या असता तेथे आरोपी आला. 


त्याने काही एक कारण नसताना शिवीगाळ करु लागला. तेव्हा ताराबाई माळी त्याला म्हणाल्या कि, तु शिव्या का देतो. असे म्हणाला असता त्याने ताराबाई ह्यांना लाथ व लोखंडी फायटरने मारुन जखमी केले. त्यावेळी ताराबाई ह्यांचा मुलगा सोडवण्यासाठी आला असता त्यालाही आरोपीने शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.


त्यानंतर काही वेळातच आरोपी ताराबाई ह्यांच्या घरी गेला. आणि त्याने ताराबाई ह्यांचे छप्पर कुऱ्हाडीने पाडुन त्याचे नुकसान केले. घटनेनंतर ताराबाई रामदास माळी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.


त्या फिर्यादीवरून आरोपी किरण सिताराम माळी, रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ६६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३२४ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.