वरातीमध्ये नाचायला चल, असे म्हणाल्याचा राग आल्याने तरुणाला लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
वरात सुरु असताना नाचायला चल, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी अजय पवार या तरुणाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथे दि. ६ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
अजय भानुदास पवार, वय २६ वर्षे, रा. पवार वस्ती, कॅनॉलचे जवळ खेडले परमानंद रोड, पिंप्री वळण, ता. राहुरी, या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पिंप्री वळण येथे दि. ६ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वरात चालु असताना तेथे आरोपी दारु पिवुन आले होते. त्यावेळी अजय पवार आरोपीला नाचायला चल असे म्हणाला असता त्याला शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यानी मारहाण केली.
त्यानंतर दि. ७ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजे सुमारास अजय पवार व त्याची पत्नी त्यांच्या राहते घराच्या पाठीमागील शेतात घासाची भाजी घेत असताना तेथे आरोपी आले. त्यांनी काहीएक न बोलता अजय याला गलोरीच्या इचकीने (मुठ) मारुन जखमी केले. तसेच लाथा बुक्क्यानी मारहाण केली. नंतर तु परत मला भेट तुला जीवंत मारुन टाकतो, अशी धमकी दिली.
अजय भानुदास पवार याच्या फिर्यादीवरून चेतन वसंत जाधव, रा. पिंप्री वळण, ता. राहुरी, व त्याचा मेव्हणा (नाव गाव माहीत नाही) या दोघांवर गुन्हा रजि. नं. ६४७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२), ११५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
