Type Here to Get Search Results !

राहुरी - शेतीच्या वादावरून माय लेकीला काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण

 शेतीच्या वादावरून माय लेकीला काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण. 



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतीच्या वादावरून आरोपींनी दोघा माय लेकीला काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ६ जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे घडली. 


मिना ज्ञानदेव शिरसाठ, वय ५५ वर्षे, रा. देसवंडी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, मिना शिरसाठ यांच्या नावावर देसवंडी शिवारात एक एकर दोन गुंठे शेती आहे व सदर शेती शेजारी त्यांचे भावबंध सोपान एकनाथ शिरसाठ यांची शेती आहे.


दि. ६ जून २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान मिना शिरसाठ व त्यांची मुलगी त्यांचे शेतामध्ये असतांना तेथे आरोपी आले. व मला म्हणाले की, तु आमच्या शेती खरेदीचे पैसे दे नाहीतर १० गुंठे शेती दे. असे म्हणाले असता मिना शिरसाठ त्यांना म्हणाल्या की, मी तुम्हाला तेव्हाच रोख पैसे दिलेले आहेत. आता तुम्हाला १० गुंठे शेती देण्याचा काही संबंध नाही.


असे म्हणालेचा आरोपींना राग आल्याने त्यांनी मिना शिरसाठ व त्यांच्या मुलीला काठीने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच तुम्ही आम्हाला १० गुंठे शेती दिली नाहीतर तुम्हाला इथे शेती करु देणार नाही, नाहीतर तुला येथेच गाडुन टाकु, अशी धमकी दिली.


घटने नंतर मिना ज्ञानदेव शिरसाठ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी सोपान एकनाथ शिरसाठ, विकास सोपान शिरसाठ, मंदाबाई सोपान शिरसाठ, सर्व रा. देसवंडी, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ६४४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.