Type Here to Get Search Results !

राहुरी | आमची गाडी परत दे मला फायनान्स वाले त्रास देत आहेत, असे म्हणून बेदम मारहाण

 अक्षय पवार यांना लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


आमची गाडी परत दे मला फायनान्स वाले त्रास देत आहेत, असे म्हणून बेदम मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आमची गाडी परत दे मला फायनान्स वाले त्रास देत आहेत, असे म्हणून चार जणांनी अक्षय पवार यांना शिवीगाळ करुन लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २३ जून रोजी दुपारच्या सुमारास हाॅटेल निसर्ग येथे घडली. 


अक्षय अशोक पवार, वय २६ वर्षे, हे राहुरी शहरातील येवले आखाडा येथे राहत असून ते राहुरी काॅलेज समोरील हॉटेल निसर्ग येथे वेटर म्हणुन काम करतात. त्यांनी दिनेश किशोर गोर्डे याचेकडुन स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एम एच १७ सी क्यु ५०२८ ही विकत घेतली. पंरतु त्यांनी सदरची गाडी अद्याप नावावर केली नव्हती.


दि. २३ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजे दरम्यान अक्षय पवार हे हॉटेल निसर्ग येथे काम करत असताना तेथे आरोपी आले व म्हणाले कि, आमची गाडी परत दे, मला फायनान्सवाले त्रास देत आहेत. त्यावेळी अक्षय पवार त्यांना म्हणाले की, माझे पैसे द्या व गाडी घेवुन जा, त्यावेळी ते म्हणाले की, आता पैसे नाहीत.


असे म्हणुन आरोपींनी अक्षय पवार यांना शिवीगाळ करुन लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच मला माझी गाडी आजच्या आज पाहिजे, नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली. घटने नंतर अक्षय अशोक पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी दिनेश किशोर गोर्डे, प्रवीण खेडेकर, दोघे रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, तसेच दोन अज्ञात इसम अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. ७००/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५२, प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.