Type Here to Get Search Results !

राहुरी | बांधावर गवत टाकु नको, असे म्हणत पुतण्याकडून चुलतीला मारहाण

 बांधावर गवत टाकु नको, असे म्हणत पुतण्याकडून चुलतीला मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


बांधावर गवत टाकु नको, असे म्हणत पुतण्याने चुलतीला शिवीगाळ करुन लाकडी दांडा व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वळण येथे दि. ३१ मे रोजी घडली. या घटने बाबत काल राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


कुसुमबाई श्रीधर डमाळे, वय ६० वर्षे, ह्या राहुरी तालुक्यातील वळण येथे राहत असून त्यांची वळण शिवारात शेती असुन शेजारीच त्यांचा पुतण्या दिलीप आसाराम डमाळे याची शेतजमिन आहे.


दि. ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान कुसुमबाई डमाळे ह्या त्यांच्या शेतात काम करीत असताना तेथे आरोपी आला व म्हणाला की, तु बांधावर गवत टाकु नको, त्यावेळी कुसुमबाई डमाळे त्याला म्हणाल्या की, बांध तुझा व माझा देखील आहे. असे म्हणालेचा राग आल्याने त्याने कुसुमबाई डमाळे यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडा व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. 


या घटने बाबत कुसुमबाई श्रीधर डमाळे यांनी काल राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप आसाराम डमाळे, रा. वळण, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ७०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.