बबन भोसले व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तूम्ही आमच्या हद्दीत ओटा बांधु नका, तुमच्या हद्दीच ओटा बांध, असे म्हणत आरोपींनी बबन भोसले व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २४ जून रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली.
बबन बाबासाहेब भोसले, वय ५५ वर्षे, रा. दवणगाव ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २४ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजे सुमारास दवणगाव ग्रामपंचायत मार्फत दलित वस्ती सुधारगृह योजने अंतर्गत बबन भोसले यांच्या घराचे दारात सिंमेटचा ओटा करण्याचे काम सुरु होते.
त्यावेळी आरोपी म्हणाले की, तुम्ही आमच्या हद्दीत ओटा बांधु नका, तुम्ही तुमच्या हद्दीच ओटा बांध. त्यावेळी बबन भोसले यांची सुन त्यांना म्हणाली की, आमच्याच जागेत ओट्याचे काम चालु आहे. त्यावेळी आरोपींनी बबन भोसले व त्यांच्या सुनाला शिवीगाळ करुन लाकडी काठीने मारहाण केली. त्यावेळी बबन भोसले यांचे दोन मुले तेथे आले असता आरोपींना त्यांना देखील लाथाबुक्यांनी मारहाण केली.
बबन बाबासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी एकनाथ गणपत खपके, गणेश एकनाथ खपके, पप्पु एकनाथ खपके, तिघे रा. दवणगाव, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
