Type Here to Get Search Results !

राहुरी - एकनाथ खपके यांना लाकडी दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


 


एकनाथ खपके यांना लाकडी दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण.


बांधावर दगड टाकु नका, तुमच्या हद्दीत टाका, असे म्हणाल्याचा राग आल्याने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


बांधावर दगड टाकु नका, तुमच्या हद्दीत टाका, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी एकनाथ खपके यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडे व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. २४ जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे घडली. 


एकनाथ गणपत खपके, वय ५५ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहत असून जमिनी शेजारी बबन भोसले याची जमीन आहे. दि. २४ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान एकनाथ खपके हे त्यांच्या शेतात गेले होते. तेथे आरोपी शेतीच्या बांधावर दगड टाकीत होते. तेव्हा एकनाथ खपके त्यांना म्हणाले की, बांधावर दगड टाकु नका, तुमच्या हद्दीत टाका.


असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी एकनाथ खपके यांना घाणघाण शिवीगाळ करुन लाकडी दांडके व लाथा बुक्याने मारहाण केली. तसेच तु परत जर आमच्या नादी लागला तर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली. 


एकनाथ गणपत खपके यांच्या फिर्यादीवरून आरोपी बबन बाबुराव भोसले, नितीन बबन भोसले, सचिन बबन भोसले, तिघे रा. दवणगाव, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७०७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.