पती त्याच्या पत्नीची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पळाला.
धक्काबूक्की करुन पत्नीची रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग हिसकावुन पती पसार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
दारु पिऊन आलेल्या पतीने पत्नीला धक्काबूक्की करुन पत्नीची रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग हिसकावुन पती पसार झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. २४ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
अश्विनी बाबासाहेब विधाटे, वय ३१ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, हल्ली रा. वडनेर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अश्विनी विधाटे यांचा पती बाबासाहेब याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दोघामध्ये लग्न झाल्यापासुन दारू पिण्याचे कारणावरुन भांडणे होत आहेत.
अश्विनी विधाटे ह्या सुमारे सहा महिन्यापासुन आई वडीलांच्या घरी वडनेर येथे राहतात. त्या सचिन गायकवाड यांच्या देवळाली प्रवरा येथील सेतु कार्यालयामध्ये काम करतात. दि. २४ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अश्विनी विधाटे ह्या सेतु कार्यालयामध्ये कामावर असताना त्यांचा पती बाबासाहेब हा दारू पिवुन सेतुचे बाहेर आला व अश्विनी विधाटे यांना सेतुचे बाहेर बोलाविले.
त्यावेळी पती बाबासाहेब याने पत्नी अश्विनी विधाटे यांना काही कारण नसताना घाण घाण शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. नंतर त्याने पत्नीची ५ हजार रुपए रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग हिसकावुन तो पसार झाला.
अश्विनी बाबासाहेब विधाटे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पती- बाबासाहेब पोपट विधाटे, रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ७१२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११९ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
