Type Here to Get Search Results !

पारनेर ,अहिल्यानगर - श्री ढोकेश्वर विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी:

 श्री ढोकेश्वर विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी:-




 समता, बंधुता यांची शिकवण देणारा लोक राजा राजर्षी शाहू महाराज - डॉ. खिलारी


         अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर या विद्यालयात 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. भाऊसाहेब  खिलारी यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केले. राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता तसेच आरक्षणासाठी प्रयत्न केले. समता, बंधुता अशी शिकवण देणारा लोक राजा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील. असे डॉ. खिलारी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माजी प्राचार्य  सुनील वाव्हळ, विद्यमान प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षिका  मनीषा गाडगे, प्रा. राजेंद्र लोंढे, कल्पना जाधव या सर्वांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

          याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा जीवन परिचय, सामाजिक व राजकीय कार्याविषयी आपल्या भाषणातून माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यासपीठावरील मान्यवर व सर्व शिक्षकांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली गायखे, सूत्रसंचालन अतुल सैद व आभार प्रदर्शन नीलम खिलारी या शिक्षकांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  संतोष सोनावळे, कला विभागाचे समन्वयक  विजय सोबले, विज्ञान विभागाचे समन्वयक  अशोक गांगड, ज्येष्ठ शिक्षक  मल्हारी वाघस्कर,  शिवाजी नरसाळे, भाऊसाहेब  हिंगडे, बाबासाहेब जाधव,  रविंद्र ज्योतिक, नारायण शेळके, सुरेखा ठाणगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रिया डव्हणे व विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.