Type Here to Get Search Results !

राहुरी - पोलिस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाला आंदोलनचा इशारा.

 पोलिस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाला आंदोलनचा इशारा.



शहरातील अनेक समस्यां बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने वेधले लक्ष.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावरील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली स्ट्रीट लाईट त्वरीत सुरु करावी. तसेच रस्त्यावर व कडेला असलेले खड्डे दुरुस्त करून चार ठिकाणी सिग्नल चालू करण्यात यावे. या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष निलेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, नगर मनमाड रोडवर राहुरी शहर हद्दीत असणारे सर्व स्ट्रीट लाईटची दुरावस्था होवुन सदर स्ट्रीट लाईट बंद स्वरुपात आहे. फक्त शो करिता सदर स्ट्रीट लाईटचे पोल उभे आहे. दिवसा सदरचे पोल चांगले दिसतात. पण रात्रीच्या वेळी सदर नगर-मनमाड रोडवर अंधकार पसरलेला असतो. त्यामुळे आमच्या जीवनात ही अंधार पसरला की काय असे चित्र समोर आहे. 


तसेच काही ठिकाणी लाईटचे पोल देखील पडले आहे. याकडे आपले लक्ष नाही. नगर मनमाड रोडवर रहदारीचे प्रमाण वाढलेले आहे. यातच पायी चालणारे नागरिक, वृध्द नागरीक, महिला, शाळेतील मुले-मुली यांना वेळोवेळी रस्ता ओलांडवा लागतो. परंतु सदर नगर - मनमाड रोडवरील चौकात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या तसेच इतर साधनांमुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत असुन जिव धोक्यात घालुन रस्ता ओलांडवा लागतो. 


नगर मनमाड रोडवर शनि- शिंगणापुर फाटा, जुने बस स्थानक, जिजाऊ चौक, जुनी पाण्याची टाकी येथे कायम स्वरुपी वाहतूक पोलिस नेमावा व सिग्नल चालु करण्यात यावेत. रस्त्यावर व कडेला असलेले खड्डे ताबडतोब दुरुस्त करावेत.


त्याच बरोबर राहुरी शहरात बंदीस्त गटारी करण्यात आल्या आहेत. परंत पावसाचे पाणी जाणेकरीता सोय केलेली नाही. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचुन मोठ्या प्रमाणात पाणी रस्तावर साठत आहे. तसेच पाण्यामुळे व बंदीस्त गटारीच्या कामामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे होवुन त्यात पाणी साचुन अपघात होत आहे. भुयारी गटारीच्या चेंबरला होल केलेले नाही त्यामुळे पाणी वाहुन जात नाही.


पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालून सदर कामे तात्काळ मार्गी लावावीत. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, मनोज गवळी, सुभाष शिरसाठ, दिपक साळवे, स्वराज शिरसाठ, अक्षय शिरसाठ आदिसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.