Type Here to Get Search Results !

राहुरी - आईच्या मौतीला आल्या नाही म्हणुन महिलेस मारहाण

 आईच्या मौतीला आल्या नाही म्हणुन महिलेस मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तु माझ्या आईच्या मौतीला का आली नाही, असे म्हणुन दिराने भावजयला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे दि. ६ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. 


उषा चंद्रकांत वाघ, वय ४९ वर्ष, रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ६ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उषा वाघ ह्या त्यांच्या घरासमोर असतांना त्यांचा दिर नानासाहेब वाघ हा तिथे आला व मला म्हणाला की, तुम्ही माझी आई वारली तेव्हा मौतीला का आले नाही.


तेव्हा उषा वाघ ह्या त्याला म्हणाल्या की, तु नेहमी आमच्या सोबत वाद घालतो, त्यामुळे आम्ही मौतीला आलो नाही. असे म्हणालेचा त्याला राग आल्याने त्याने उषा वाघ ह्यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहान करुन माझे कपाळावर चावा घेतला. तेव्हा उषा वाघ ह्याचा मुलगा सुनिल व नात चैताली हे सोडवासोडव करण्यासाठी आले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहान केली. तसेच तुम्हाला दगडाने जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.


उषा चंद्रकांत वाघ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब मुंजाबा वाघ, रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ६४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.