अल्पवयीन मुलीला पळवीले, पोलिसात अपहरणचा गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
नवीन घराचे सुरु असलेले काम पाहुन येते, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. ही घटना दि. ५ जून रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात घडली.
या घटनेतील १६ वर्षे ९ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात तीच्या कुटुंबासह राहते. दि. ५ जून २०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजे दरम्यान पिडीत मुलगी नवीन घराचे सुरु असलेले काम पाहुन येते. असे सांगून घरातून बाहेर पडली. खुप वेळ झाला तरी ती घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा आजुबाजुला शोध घेतला. परंतु ति मिळुन आली नाही.
नातेवाईकांनी तिच्या मोबाईलवर फोन केला असता तो बंद होता. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पिडीत मुलीला फुस लावुन पळवून नेले. अशी नातेवाईकांची खात्री झाली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा रजि. नं. ६४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
