भटारकरवस्ती येथे चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटारकरवस्ती शाळेच्या वतीने इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नव विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर द्वारे प्रभातफेरी काढून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान समितीचे जेष्ठ सदस्य दिलीप दाढकर यांनी भूषविले.
तदनंतर अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पारेकर सर यांनी केले. याप्रसंगी इयत्ता पहिली च्या वर्गामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तसेच इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गणवेश, बुट व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच जेवणाची गोड मेजवानी देण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मिक हारदे उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, समाजिक कार्यकर्ते सुरेश लाटे, माजी उपसरपंच मुरलीधर पारखे, ग्रा. सदस्य सर्जेराव सोनवणे, समितिचे भारत लाटे, यशवंत लाटे, ग्रामसेवक बडाख, शाळेच्या मुख्याधापिका श्रीम. मिनाक्षी पाळंदे मॅडम, काडाळे मॅडम, भाकरे मॅडम, कोरूलकर मॅडम, वाघमारे मॅडम यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापिका पाळंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील आठवणी सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बोकंद सर यांनी केले तर हौशीनाथ सजन सर यांनी आभार मानले.
