मा. खा. तनपूरे यांनी बैठक बोलावून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
बातमीची दखल घेत मा. खा. तनपूरे यांची नगरपरिषद शाळे बाबत बैठक.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी स्टेशन गावठाण येथील नगरपालिका शाळा नंबर पाच च्या दुरावस्थे बाबत शिवसेनेचे अशोकराव एकनाथ तनपुरे व तांदुळवाडी ग्रामपंचायत सदस्य निसारभाई सय्यद यांनी तक्रार केली होती. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच
त्या वृताची दखल घेत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरपालिका अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, माजी शिक्षण मंडळाचे सभापती संजय कुलकर्णी व शाळेचे मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक घेऊन शाळे संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्या विषयीच्या सूचना केलेल्या आहेत.
नगरपालिका शाळा नंबर ५ ला कंपाऊंड नाही, मुलांसाठी शौचालय, मुतारी नाही, इमारतीसह पडवीतील फरश्या खचल्या आहेत. स्टेज नादुरुस्त झालेले आहे. पावसाळ्यात शाळेसमोर गुडघाभर पाण्याचे तळे साचते, यामुळे मुलांना जीव मुठीत घरून शिक्षण घ्यावे लागत आहे. कंपाऊंड नसल्यामुळे शाळेत जनावरे मोकाट फिरतात, रात्रीच्या वेळी बाहेरील काही महाभाग शाळेच्या पडवीत बसून नशा पाणी करतात आदि तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या.
यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती बघून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. शाळा नगरपालिकेची व हद्द तांदुळवाडी ग्रामपंचायतची असल्याने या शाळेकडे नगरपालिका ही लक्ष देत नाही व ग्रामपंचायतही लक्ष घालित नसल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक या शाळेतील मुले तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांचे ते मुले असून ह्या गोष्टींकडे जसे पालिकेचे कर्तव्य आहे. तसे तांदुळवाडी ग्रामपंचायतीचेही कर्तव्य आहे. त्यांनी पण शाळेच्या विकास कामात आपले योगदान दिले पाहिजे.
माजी खासदार तनपुरे यांनी ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे यांना कंपाऊंड चे प्रस्ताव करण्यास सांगून पालिका व ग्रामपंचायतीने शाळा परिसरात मुरूम टाकण्यास सांगितले आहे. रात्रीच्या वेळी शाळेत नशा पाणी करणाऱ्यांचाही बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता पराग दराडे, सहाय्यक बाबा गुंजाळ यांनी शाळेत जाऊन सर्वत्र पाहणी करून अहवाल प्रशासनाला दिला दिला आहे.
चर्चेमध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती संजय कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधीक्षक सय्यद, शाळेचे मुख्याध्यापक सतीश धोत्रे, अशोकराव तनपुरे, सय्यद निसारभाई आदींनी चर्चेत भाग घेतला.गावठाण शाळेस संरक्षक भीत बांधून देण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचना माजी सरपंच व डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक ॲड. तान्हाजीराव धसाळ यांना फोन करून सांगितले.
चौकट ----
( तांदुळवाडी हद्दीतील नगरपालिकेची शाळा गावठाणतील अवघ्या दोन खोल्यात भरत होती. त्या शाळेची अवस्था पाहून तत्कालीन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी या शाळेला खासदार निधीतून २ वर्ग खोल्या व नंतर आमदार निधीतून सर्व शिक्षा अभियान योजनेतून १३ लाख रुपये खर्चातून ७ वर्ग खोल्या बांधून दिल्यानंतर या शाळेसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने व नगरपालिकेने एक रुपयाही खर्च केला नाही. त्यावेळी सदर शाळेस वर्ग खोल्या कमी पडतात त्या बांधून देण्यासाठी पत्रकार कै. मुखतार सय्यद, बाळासाहेब पेरणे, इंद्रभान नाना पेरणे व सय्यद निसार यांनी आग्रह धरला होता. व तो तनपुरे यांनी पूर्ण केला.
