डाॅ. चौधरी यांना लोखंडी राॅड व दांड्याने बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
काहीएक कारण नसताना आरोपींनी जनावरांचे डॉ. तेजस चौधरी यांना शिवीगाळ करुन लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. २६ जून रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा परिसरात घडली.
जनावरांचे डॉ. तेजस राजेंद्र चौधरी, वय २१ वर्षे, रा. गुजरवाडी, ता. श्रीरामपुर, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, तेजस चौधरी हे दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे गायांची तपासणी करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपींनी त्यांना काहीएक कारण नसताना शिवीगाळ करुन लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर तेजस राजेंद्र चौधरी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
त्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण शिवाजी जाटे व शिवाजी भिमाजी जाटे, दोघे रा. तिळापुर (जागेश्वरी आखाडा), ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. ७२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), ३५२, ११५ (२), ११८ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
