मक्का मुस्लिम एज्युकेशन फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.
जो समाज शिक्षण घेतो, तो कधीही मागे राहत नाही- मुफ्ती मुजम्मिल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मक्का मुस्लिम एज्युकेशन फाउंडेशन, राहुरी यांच्या वतीने आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद वेल्फेअर अँड एज्युकेशन फाउंडेशन संचलित मौलाना आझाद नर्सरी स्कूल, आझाद नगर, राहुरी येथे नर्सरी व एलकेजीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि खाऊ वाटपाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुफ्ती मुजम्मिल हे होते. त्यांनी आपल्या सखोल आणि हृदयस्पर्शी भाषणातून मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या दिशेने मार्गदर्शन करतांना सांगितले की शिक्षणामुळेच समाजाची उन्नती होते. शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, ती जीवनाची खरी दिशा आहे. जो समाज शिक्षण घेतो, तो कधीही मागे राहत नाही. कुरआन मध्ये आलेला पहिला आदेश 'इक़रा' म्हणजे वाचा. हा ज्ञानाच्या वाटेवर चालण्याचा संदेश देतो. हे शिक्षण केवळ धार्मिक मर्यादेत नाही, तर आधुनिक विज्ञान, गणित, भाषा, आणि तंत्रज्ञान यांमध्येही आवश्यक आहे.
आजच्या या निरागस चिमुकल्यांमध्ये उद्याचे डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, समाजसेवक, प्रशासक तयार होत आहेत. त्यासाठी शिक्षणाची गोड सवय आजपासूनच लागली पाहिजे. पालकांनी मुलांच्या शिक्षणात अडथळा न होता, प्रेरणादाता व्हावे. मुलींच्या शिक्षणालाही तितकंच महत्त्व द्यावं. कारण एक शिक्षित मुलगी एक संपूर्ण समाज घडवू शकते. गणवेश हे विद्यार्थ्यांमधील समानता, शिस्त आणि शिक्षणा विषयी आदर जागवणारे माध्यम आहे. समाजाची खरी उन्नती शाळेच्या उंबरठ्यावरूनच सुरू होते. म्हणून प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने निर्धार करावा की माझं मूल शिक्षण घेणार, प्रगती करणार आणि समाजासाठी अभिमान ठरणार.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, ऑडिटर एम. आर. शेख, मौलाना नसीम, हाजी खलीलशेठ शेख, फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि. गालिब शेख, मुनव्वर कादरी, डॉ. अब्दुल रज्जाक सय्यद, जिलानी बेग, रफिक सय्यद, सलीम मुसानी, नसीर शेख, शब्बीर शेख, दायमी सहाब, इलियास पठाण, रफिक शेख, अख्तर कादरी, रईस पटेल, इम्रान सय्यद, अब्दुल सत्तार शेख, मुज्जूभाई कादरी, हाफीज मुजाहिद पठाण, जुनेद कुरेशी, शाहरुख शेख, मन्सूर पठाण, तौसिफ शेख, तौसीफ कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आसिफ पटेल सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीर शेख सर यांनी अत्यंत मनोज्ञपणे सादर केले. शाळेतील शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
