Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर ग्रुपच्या सर्व विद्यालयांत नवगतांचे उत्साहात स्वागत ...



 


शिवांकुर ग्रुपच्या सर्व विद्यालयांत नवगतांचे उत्साहात स्वागत...

साक्षरतेचा एकच मंत्र, शिक्षण देणे हेच तंत्र या उक्ती प्रमाणे  राहुरी तालुक्यातील सुरू असलेल्या शिवांकुर ग्रुपच्या, शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालय कोंढवड, शिवांकुर रेन्बो स्कूल राहुरी, तसेच शिवांकुर विस्डम स्कूल खडांबे या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

शिवांकुर विद्यालय मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले•

शिक्षण हे माध्यम समाजात बदल घडवून आणण्याचे प्रमुख शस्त्र आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन पुस्तकाचे वाटप करण्यात आले. 

प्रसंगी नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त मंगल पवार, डॉ गौरी पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल फाटक व आभार प्रदर्शन सुजाता तारडे यांनी केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबल, ज्योती शेळके, प्रियंका पांढरे, शितल फाटक, सुजाता तारडे, प्रिया लांबे, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर, सुनीता ढोकणे, मोहिनी पेरणे, वर्षा कांबळे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, अनिता म्हसे शिपाई उत्तम पवार, शारदा तमनर, लता कासवत वाहतुक विभाग प्रमुख अशोक गाडे, सखाराम बाचकर, अविनाश तनपुरे, नवनाथ गाडे, पिनू आहेर, नंदु गिरी, कैलास गडधे, चौधरी, अनिल गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रसंगी 

शिवांकुर विस्डम स्कुलच्या उमा हंडाळ, श्रध्दा सोनवणे, स्वाती लहारे, हरिश्चंद्रे मामा, संजय अहिरे आदींसह अनेक पालक उपस्थित होते.

नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रसंगी शिवांकुर रेनबो स्कूलच्या कावेरी शेळके, रितु चाकोते, अनिता भुजाडी आदींसह बहुसंख्य पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.