Type Here to Get Search Results !

राहुरी | श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

 श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे आज दि. १९ जुलै २०२५ ते दि. २५ जुलै २०२५ या कालावधीत श्री पांडुरंग महोत्सव (गोपाळकाला) सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे. आज शनिवारी सायंकाळी ५ वाजता श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पायी पालखी सोहळ्याकरीता गेलेल्या पालखी रथाचे आगमन व स्वागत करण्यात येणार आहे.


रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता भिक्षा कार्यक्रम, अभिषेक, काकडा आरती, नैवेद्य  हरिपाठ, व गोपाळ काल्यासाठी आलेल्या दिण्डीचे  स्वागत 

सोमवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी काकड, भजन, महाअभिषेक, आरती नैवेद्य नगर प्रदक्षिणा, सकाळी ११ वाजता एकादशी नियमाचे हभप नाना महाराज गागरे यांचे हरिकिर्तन दुपारी बारा वाजता मध्यान आरती व महाप्रसाद (फराळ) वाटप, सायंकाळी हरिपाठ, रात्री सात वाजता हभप उल्हास महाराज सुर्यवंशी (आळंदी) यांचे हरिकीर्तन.


मंगळवार दि. २२ जुलै रोजी काकडा भजन कुळधर्म कार्यक्रम द्वादशी पारणे महाप्रसाद, सकाळी १० वाजता हरिकिर्तन दुपारी ४ वाजता प्रवचन, हरिपाठ, रात्री ७ वाजता साई कथाकार हभप विकास महाराज गायकवाड (शिर्डी) यांचे हरिकिर्तन.


बुधवार दिनांक २३ जुलै रोजी काकडा भजन आरती नैवेद्य अभिषेक, सकाळी ९ वाजता हभप बाळकृष्ण महाराज कांबळे शास्त्री (ताहाराबादकर) यांचे फडकरी काला किर्तन दुपारी १२ वाजता संगीत भजन, दुपारी ३ वाजता हभप अर्जुन महाराज तनपुरे यांचे गोपाळ काल्याचे हरिकिर्तन व दही हंडी कार्यक्रम. 


गुरुवार दिनांक २४ जुलै रोजी छबीना मिरवणूक, पुजा आरती, शिळा गोपाळकाला, शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पाऊल घडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत कवि महिपती महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले.