Type Here to Get Search Results !

राहुरी | १८ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर निषेध सभा.

 १८ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर निषेध सभा.



सर्व सामाजिक, पुरोगामी, आणि बहुजन चळवळीतील संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि पुरोगामी विचारधारा प्रसारक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दि. १३ जुलै २०२५ रोजी झालेल्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व संघटनांना एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हल्ल्याने महाराष्ट्रातील सामाजिक समता आणि पुरोगामी विचारांच्या चळवळीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 


या निंदनीय कृत्या विरोधात एकत्रितपणे आवाज उठवण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी राहुरी येथील तहसील कार्यालय येथे निषेध सभेसाठी उपस्थित राहून सामाजिक न्याय आणि अहिंसक विचारांचा संदेश दृढ करूया.


विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे, हिंसेने नाही. यासाठी शहर व तालुक्यातील सर्वच संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदिंनी दि. १८ जुलै २०२५ रोजी राहुरी येथील तहसील कार्यालय येथे सकाळी १० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्या कार्याला पाठबळ द्यावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.