३ लाख रुपयांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
हार्वेस्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपए घेऊन यावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करुन घरातून काढून देण्यात आले. या बाबत सासरच्या चार लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रियंका संदेश सिनारे, वय ३२ वर्षे, रा. सात्रळ, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, प्रियंका सिनारे यांचा विवाह २७ मे २०१३ रोजी संदेश सिनारे, रा. सात्रळ याच्याशी झाला होता. सासरच्या लोकांनी सुरुवातीचे काही दिवस प्रियंका सिनारे यांना व्यवस्थित नांदवीले. त्यानंतर तुला स्वयंपाक चांगला येत नाही व तुला घरातील कोणतेच काम निट येत नाही. तुझ्या आई वडीलांनी तुला काही चांगले शिकवले नाही. असे म्हणुन छळ सुर केला.
त्यानंतर हार्वेस्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपए घेऊन यावेत, यासाठी सासरच्या लोकांनी प्रियंका सिनारे यांचा शारीरिक व मानसिक छळ करुन त्यांना घरातून काढून देण्यात आले.
प्रियंका संदेश सिनारे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पती- संदेश मच्छींद्र सिनारे, सासरा- मच्छींद्र भिकाजी सिनारे, सासु- इंदुमती मच्छींद्र सिनारे, दिर- श्रेयस मच्छींद्र सिनारे, सर्व रा. सात्रळ, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ७५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.