सांडपाणि शेतात सोडल्याचा जाब विचारला म्हणून चांगदेव दिघे यांना मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
सांडपाणि शेतात सोडल्याचा जाब विचारला म्हणून आरोपीने चांगदेव दिघे यांना वीटाने मारुन जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे दि. ४ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.
चांगदेव हरिभाऊ दिघे, वय ४८ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील धानोरे येथे राहत असून त्यांची शेती माहेगाव येथे आहे. त्यांच्या शेती शेजारी भिष्मा गरूड याची शेती असुन त्याने त्याचे घरातील सांडपाणी जनावरांचे मलमुत्र, संडासाचे पाणी हे दिघे यांच्या शेतात सोडून दिले आहे.
दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान चांगदेव दिघे हे भिष्मा गरूड यास म्हणाले कि, तुम्ही सांड पाण्याचा बंदोबस्त करा, ते आमचे शेतात येत असल्यामुळे वाटेकरू यास त्रास होत आहे. तेव्हा भिष्मा गरूड म्हणाला कि, हे शेत माझे आहे, मी काढणार नाही असे म्हणून त्याने चांगदेव हरिभाऊ दिघे यांना वीट मारुन जखमी केले.
त्यांच्या हाथाला फॅक्चर झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भिष्मा गरूड, रा. माहेगाव, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ७५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.