Type Here to Get Search Results !

पारनेर | वडगाव सावताळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : भाऊसाहेब शिंदे

 वडगाव सावताळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : भाऊसाहेब शिंदे



 जिल्हा परिषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट; पत्रा शेड कामाचा शुभारंभ


पारनेर/प्रतिनिधी : 

वडगाव सावताळ मध्ये लोकसहभागातून सावताळ बाबा देवस्थान तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक सामाजिक धार्मिक विकास कामे मार्गी लागत आहेत यापुढील काळातही लोकसहभाग वाढवून गावात सामाजिक सलोखा व एकोपा वाढवून विविध विकासात्मक कामे मार्गी लावण्याचा आमचा उद्देश असल्याचे मत वडगाव सावताळ गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे (बी. डी. दादा) यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले. 


पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा गावकऱ्यांनी एकत्र येत लोकसहभागातून कायापालट केला आहे या शाळेच्या विकासासाठी माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत आर्थिक स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात मदत केली आहे शाळेतील पत्रा शेड उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. या पत्रा शेड कामाचे भूमिपूजन माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. वडगाव सावताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील सर्वांनी एकत्र येत लोकसहभागातून वडगाव सावताळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट होत आहे. हा कायापालट सर्व गावातील एकोपा टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.


या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी वडगाव सावताळचे सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांच्यासह सरपंच संजय रोकडे, माजी सरपंच राजेंद्र रोकडे, चेअरमन शिवाजी रोकडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश खंडाळे, माजी चेअरमन बाबासाहेब दाते, अर्जुन रोकडे, मंगेश रोकडे, योगेश शिंदे, भाऊ शिंदे, राजेंद्र रोकडे, सर्जेराव रोकडे, धनंजय शिंदे, निवृत्ती शिंदे, गोरक्ष रोकडे, भाऊसाहेब रोकडे, दादाभाऊ रोकडे, अशोक रोकडे मेजर, अशोक रोकडे गुरुजी, गोरख वाणी, बाबासाहेब लोखंडचूर, भाऊ जांभळकर, पंढरीनाथ व्यवहारे, संदीप व्यवहारे, नामदेव रोकडे गुरुजी, दत्तात्रय शिंदे अण्णासाहेब दाते, ठकाजी रांधवन, सुदाम व्यवहारे, आप्पासाहेब तिखोळे, धोंडीभाऊ तिखोळे, बाजीराव पवार, रामदास तिखोळे, राजेंद्र रोकडे, सुनील रोकडे, भाऊसाहेब रोकडे, नारायण रोकडे आदी उपस्थित होते.


माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी केलेल्या मदतीचे गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.