Type Here to Get Search Results !

राहुरी | युवानेते अक्षय कर्डिले यांच्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद

 युवानेते अक्षय कर्डिले यांच्या जनता दरबाराला उदंड प्रतिसाद.



नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा झाल्याने नागरिकांचे समाधान.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी मतदार संघाचे आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले हे सध्या मुंबई येथे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात असल्याने युवा नेते, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी येथे जनता दरबार घेतला. यावेळी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


राहुरी विधानसभा मतदार संघाचे आ. शिवाजीराव कर्डिले हे सातत्याने जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत असतात. त्यामुळे कर्डिले यांच्या जनता दरबारात नागरिकांची गर्दी झालेली पाहावयास मिळते. परंतु सध्या राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू असून आ. कर्डिले हे अधिवेशनात असल्याने युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी जनता दरबार घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. 


राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यामध्ये युवा नेते अक्षय कर्डिले सध्या चांगल्या प्रकारे सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत असून सध्या अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. अक्षय कर्डिले यांच्या जनता दरबारात प्रामुख्याने युवा वर्गाचा मोठा कल पहावयास मिळत असून युवकांमध्ये अक्षय कर्डिले यांच्या सक्रिय होण्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. आज राहुरी येथे भरलेल्या या जनता दरबारात युवा नेते अक्षय कर्डिले यांनी महसूल, आरोग्य, कृषी, आदि महत्वपूर्ण विषयासंदर्भात आलेल्या तक्रारी संदर्भात जागेवर फोन करून संबंधितांना नागरिकांचे कामे करण्याच्या सूचना केल्या.


यावेळी भाजपा प्रदेश राज्य परिषदेचे सदस्य सुभाष गायकवाड, सरचिटणीस राजेंद्र गोपाळे, सिताराम ढोकणे, भाजपा मंडल तालुका अध्यक्ष विक्रम भुजाडी, युवराज गाडे, धनंजय आढाव, अनिल आढाव, नारायण झावरे, शरद किनकर, नंदकुमार डोळस, अजित डावखर, उमेश शेळके, मयूर गवळी, नितीन ढेरे, कांतीलाल जगधने, अनिल पवार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.