विद्यापीठातील सावळा गोंधळ पून्हा चव्हाट्यावर.
ॲड. संजय विधाटे यांचे न्याय मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रवेश द्वारासमोर उपोषण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
म.फु.कृ. विद्यापीठात अनेक प्रकरणांनी उच्छांद मांडला असून तशा स्वरूपाच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत असूनही विद्यापीठ प्रशासन डोळे झाकून बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच विद्यापीठात सर्वत्र रुबाब गाजवणाऱ्या व स्वतःला मिस्तरी समजनारा कर्मचारी ज्याची शैक्षणिक पात्रता नसतांना किंवा शैक्षणीक अहर्ता नसलेल्या साडे आठवी शिकलेला हा मिस्तरी झाला कसा? असा मोठा प्रश्न होता पण उपस्थित होत आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेक करत प्रशासनाला आंधळे करण्याचा डाव टाकुन मोकाट सुटलेल्या स्वतःला मिस्तरी समजनाऱ्याला विद्यापीठ प्रशासन पाठीशी का घालतंय अशी चर्चा सर्वत्र होतांना दिसत आहे. विद्यापीठ प्रशासनावर वचक निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्याची तक्रार ॲड. संजय विधाटे यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्याकडे केली होती.
याबाबत न्याय न मिळाल्याने त्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून आतातरी विद्यापीठ अधिकाऱ्यांना जाग येऊन विधाटे यांना न्याय मिळेल का ? मस्तवाल मिस्तरीवर कारवाई होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सदरील प्रकरणावर विद्यापीठ प्रशासन काय कार्यवाही करनार किंवा आपल्या कर्मचाऱ्याची पाठराखण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.