Type Here to Get Search Results !

राहुरी | शेतीच्या वादावरून पती पत्नीला मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

 शेतीच्या वादावरून पती पत्नीला मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतीच्या वादावरून आरोपींनी जयवंत पाषाण व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन लोखंडी कत्ती व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना दि. १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली.

 

जयवंत आसराम पाषाण, वय २३ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जयवंत पाषाण हे घरी असताना त्यांचा चुलता, चुलती व त्यांचे मुले घरासमोर आले म्हणाले की, काल आपली जी मोजणी झाली आहे, ती चुकीची झाली.


तेव्हा जयवंत पाषाण त्यांना म्हणाले की, आपण पुन्हा मोजणी करू, परंतु तुमच्याकडे जे माझे १० गुंठे क्षेत्र निघाले आहे, ते मला परत द्या. तेव्हा आरोपी म्हणाले कि, पहिले मोजणी होवु दे, मग बघु तुझे क्षेत्र द्यायचे आहे की नाही.


त्यावेळी आरोपींनी जयवंत पाषाण व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून लोखंडी कत्ती व लाथा बुक्क्याने मारहान केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. 


जयवंत आसराम पाषाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी दादासाहेब लक्षम्ण पाषाण, मिराबाई दादासाहेब पाषण, धनंजय दादासाहेब पाषाण, कृष्णा दादासाहेब पाषाण, सर्व रा. उंबरे, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ७८६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.