श्री ढोकेश्वर महाविद्यालयात नवीन स्टाफ चे स्वागत
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर येथे संस्थेकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध विषयांसाठी नवीन स्टाफ रुजू करण्यात आला त्यानिमित्ताने महाविद्यालयात त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तासिका तत्वावरील ५ तर कायम विना अनुदानित तत्वावर ९ तर कार्यालयासाठी ०१ अशा १५ स्टाफ नव्याने महाविद्यालयात रुजू झाला. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ विश्वस्त आदरणीय श्री सितारामजी खिलारी (अण्णा) हे होते. नवोदित प्राध्यापकांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे जेष्ठ विश्वस्त आदरणीय श्री सितारामजी खिलारी (अण्णा) यांनी महाविद्यालयातील सर्व स्टाफकडून महाविद्यालयाचा उत्कर्ष व्हावा अश्या अपेक्षा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी केले. स्टाफने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थी हित जोपासावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.