Type Here to Get Search Results !

सिन्नर नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांना शासनाच्या अभय योजनेमुळे मोठा दिलासा.

 सिन्नर नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांना शासनाच्या अभय योजनेमुळे मोठा दिलासा.



प्रतिनिधी सुरेश इंगळे C24 तास सिन्नर.


सिन्नर शहर आणि उपनगरातील नवीन मालमत्ताधारकांना नगरपालिकेने अवास्तव घरपट्टी आकारली आहे. त्यामुळे अनेकांनी ती भरलेली नाही, त्यातील घरपट्टीवरही नगरपालिकेने 24% दराने दंड व व्याज आकारली असल्यामुळे, त्या विरोधात सिन्नर शहरातील मालमत्ता धारकांनी एकत्र येऊन कृती समितीची स्थापना केलेली आहे. त्या माध्यमातून ही अवास्तव दंड व व्याज आकारणी कमी करावी यासाठी शासन दरबारी त्या समितीने पाठपुरावा केला होता घरपट्टी विरोधी कृती समितीचे माजी नगरसेवक किरण मुत्रक, सोनल लहामगे, दत्ता हांडे, पांडुरंग गणेश यलमामे, राहुल  तारगे, भाऊसाहेब शिंदे, सुभाष कुंभार, राजाराम मुरकुटे, डी पी गोळेसर, हरिभाऊ तांबे, मनोज भगत, नामदेव कोतवाल आदींनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास  आणून दिली होती. घरपट्टी कमी करण्याबरोबरच व्याज व दंड माफी करण्याचा ठराव करत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने

नगरपालिका आणि महापालिका 

क्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या घरपट्टीवरील व्याज व दंड माफी करण्यासाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. व त्याचा अध्यादेश निघालेला असून या योजनेचा लाभ सिन्नर शहरातील हजारो मालमत्ताधारकांना होणार आहे.

त्या संदर्भात सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी सर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरेश इंगळे यांनी केलेली बातचीत.