तुम्ही पोलीस स्टेशनला माझे नाव का सांगीतले, असे म्हणुन पती पत्नीला मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तुम्ही पोलीस स्टेशनला माझे नाव का सांगीतले, असे म्हणुन आरोपींनी पती पत्नीला शिवीगाळ करुन लाकडी दांडा व लाथा बुक्क्याने मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
संगीता राजेंद्र गोपाळे, वय ४५ वर्षे, रा. नविन गावठाण, गोपाळे वस्ती, बारगाव नांदुर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अक्षय गोपाळे, अभिजित गोपाळे हे दोघे संगिता गोपाळे यांचे भावबंद आहेत.
दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजेच्या दरम्यान संगिता गोपाळे ह्या त्यांच्या घरी असताना तेथे आरोपी आले. त्यावेळी अक्षय गोपाळे हा मला म्हाणाला की, मी प्रविण डोंगरेचा मित्र आहे म्हणुन तुम्ही पोलीस स्टेशनला माझे नाव का सांगीतले.
असे म्हणुन आरोपींनी संगिता गोपाळे व त्याचे पती राजेंद्र आप्पासाहेब गोपाळे यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडा व लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच तुम्ही जर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेलात तर तुम्हाला जिवे मारीन. अशी धमकी देवून संगिता गोपाळे यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मनिमंगळ सुत्र तोडुन घेतले.
त्यानंतर संगीता राजेंद्र गोपाळे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय बाबासाहेब गोपाळे, अभिजित बाबासाहेब गोपाळे, दोघे रा. बारगाव नांदुर, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजी. नं. ८४७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११९ (१), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
