Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालयाचे राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेमध्ये यश


 



शिवांकुर विद्यालयाचे राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेमध्ये यश

शिवांकुर विद्यालयातील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा तमनर हिने राज्यस्तरीय गणित अबॅकस स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक मिळवला. तिने लेवल एक मध्ये पाच मिनिटात 84 बेरीज व वजाबाकी सोडवली. अबॅकस परीक्षा ही गणित विषयासाठी उपयुक्त असुन त्याने गणित विषयाची गोडी निर्माण होते असे प्रतिपादन करत संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांनी विद्यार्थिनीचे कौतुक करत तिला मार्गदर्शन करणाऱ्या दुर्गा बारवेकर मॅडम यांचे देखील कौतुक केले. चालू शैक्षणिक वर्षात शाळेमध्येच अबॅकस शिकविण्यासाठी पुर्णवेळ शिक्षक उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या अबॅकस परीक्षेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी देखील गुणवंतांचे अभिनंदन केले तसेच या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबल, ज्योती शेळके, प्रियंका पांढरे, शितल फाटक, सुजाता तारडे, प्रिया लांबे, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर, सुनीता ढोकणे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, अनिता म्हसे, सोनाली कुमावत शिपाई शारदा तमनर,  वाहतुक विभाग प्रमुख अशोक गाडे, सखाराम बाचकर, अविनाश तनपुरे, नवनाथ गाडे, पिनू आहेर, नंदु गिरी, कैलास गडधे, चौधरी, अनिल गुंजाळ यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.