सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं हाच खरा प्रगतीचा मार्ग – आमदार काशिनाथ दाते सर
पारनेर - प्रतिनिधी
सामान्य नागरिकांच्या जीवनशैलीत होणारा सकारात्मक बदल म्हणजेच खऱ्या अर्थाने विकास असून, विकास हा केवळ भौतिक स्वरूपात मर्यादित नसून तो सामाजिक आणि मानसिक उन्नती घडवणारा असावा, असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते सर यांनी कडूस येथे आयोजित स्मशानभूमी सभामंडपाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असून, अंत्यसंस्काराच्या वेळी लागणाऱ्या मूलभूत सुविधांची उभारणी होत आहे. सामाजिक भानातून उभारले जाणारे हे काम केवळ विकासाचे प्रतीक नसून, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनांची पूर्तता देखील आहे, सरपंचांनी आजपर्यंत गावातील विविध विकासकामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी मिळवत कडूस गावातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यापुढील काळातही कडूस गावासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही आमदार दाते सरांनी यावेळी नमूद केले.
या भूमिपूजन सोहळ्याला प्रशांतदादा गायकवाड, राहुल पाटील शिंदे, अश्विनीताई थोरात, सुषमाताई रावडे, वसंत चेडे, गणेश शेळके, दिलीप दाते, सुनिल थोरात, दत्तानाना पवार, सागरभाऊ मैड, मनोज मुंगसे, ॲड. युवराज पाटील, युवराज पठारे, दादाभाऊ वारे, लहू भालेकर, संतोष गायकवाड, माजी सरपंच मीना मुंगसे, व्हा. चेअरमन आशाताई मुंगसे, राखीताई शिंदे, कचरू उबाळे, डी. बी. करंजुळे, किरण साठे, मारुती मुंगसे, दादा दिवटे सर, रमेश औटी, अजिंक्यतारा दरेकर, उमेश करंजुळे, मनोज मावळे, युवा नेते दादा मुंगसे, संतोष दिवटे, ग्रामसेवक ताजणे मॅडम, बबन रावडे, अमोल जाधव, बबन जाधव यांच्यासह कडूस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नेटके व उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी आमदार दाते सरांनी पुढील काळात गावातील अन्य विकासकामांसाठीही सकारात्मक पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास ग्रामस्थांना दिला.

