Type Here to Get Search Results !

राहुरी | राहुरी पोलीस स्टेशन ऑल आऊट- 2 मध्ये एकूण 11 दारू विक्रेत्यांवर कारवाई

 राहुरी पोलीस स्टेशन ऑल आऊट- 2  मध्ये एकूण 11 दारू विक्रेत्यांवर कारवाई.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आज दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळे दहा पथके नेमून गोपनीय माहिती काढून पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे 11 दारू विक्रेत्यांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आली. दोन महिलांसह 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 


1. रवींद्र नानासाहेब मांजरे, वय 44 वर्षे, रा. गुहा, ता. राहुरी.

2. विकास भोमा बर्डे, 32 वर्षे, रा. गुहा, ता. राहुरी.

3. चंद्रकला राजू शिंदे, वय 67 वर्षे, रा. डिग्रस गावठाण, ता. राहुरी.

4. बाळासाहेब शिवराम ससाणे, वय 54 वर्षे, रा. धामोरी बुद्रुक, रमाबाई नगर, ता. राहुरी.

5. संदिप सुदाम गायकवाड, वय. 34 वर्षे, रा. चिंचाळा, ता. राहुरी.

6. रवींद्र विनोद पवार, वय 35 वर्षे, रा. सोमय्या फार्म, लाख, ता. राहुरी.

7. सोपान नामदेव पुजारी, वय 45 वर्षे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी.

8. महेश सिताराम शिरसाठ, वय 27 वर्षे, रा. कोपरे, ता. राहुरी, 

9. बाबासाहेब दादा सगळगीळे, वय 60 वर्षे, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी.

10. सुनिल जबाजी पवार, वय 53 वर्षे, रा. वरवंडी, ता. राहुरी.

11. सुरेखा सचिन जगताप, वय 25 वर्षे, मानोरी,  ता. राहुरी.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उप विभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस पथकाने केली.