Type Here to Get Search Results !

राहुरी | मागील भांडणाच्या कारणावरुन चुलता व पुतण्यास मारहाण.

 मागील भांडणाच्या कारणावरुन चुलता व पुतण्यास मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मागिल भांडणाचा राग मनात धरून चुलता व पुतण्यास विटांच्या तुकड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. 1 ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे घडली आहे. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


दादाहरी सोपान रोठे, रा. तिळापुर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सुमारे दोन महिन्या पुर्वी तिळापुर गावच्या जत्रेच्या वेळी त्यांना गावातील विजय गरदरे, जालु कोळेकर व इतर लोकांनी मला मारहाण केली होती. त्यावेळी त्या लोकांचे विरुध्द राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता. 


मात्र दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दादाहरी रोठे व त्यांचा पुतण्या गौरव रोठे गावात उभे असताना विजय गरदरे व जालु कोळेकर यांनी काहीही कारण नसताना मागील भांडणाचा राग मनात धरुन पाठीमागुन विटाचे तुकडे फेकुन मारून व शिविगाळ करून पळून गेले. त्यामुळे त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. तसेच पुतण्या गौरव याच्या उजव्या खांद्यावर दुखपत झाली.


दादाहरी सोपान रोठे, रा. तिळापुर, ता. राहुरी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विजय नामदेव गरदरे, जालु नामदेव कोळेकर, दोघे रा. तिळापुर, ता. राहुरी यांच्या विरोधात गु.र.नं. 841/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.