Type Here to Get Search Results !

राहुरी | विवाहित महिलेचा छळ, पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल

 विवाहित महिलेचा छळ, पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


विवाहितेला मारहाण व मानसिक छळ करून घराबाहेर हाकलून दिल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रेशमा बाबासाहेब पंडीत, रा. सडे, ता. राहुरी, या ३३ वर्षीय विवाहित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी म्हटले, दि. २६ ऑक्टोबर २००६ रोजी बाबासाहेब राजू पंडीत, रा. भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. अहील्यानगर यांच्यासोबत सडे येथे तीच्या आई-वडिलांनी मान-सन्मान देऊन माझे लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर तीला दोन मुली झाल्या आहेत, सुमारे सहा ते सात वर्षांपर्यंत सासरच्या लोकांनी तीला चांगल्या प्रकारे नांदविले. 


त्यानंतर पती अधून-मधून दारू पिऊन तीच्यावर संशय घेऊन मारहाण करत असल्याने ती सडे येथे माहेरी निघून आली. पती बाबासाहेब हा माहेरी सडे येथे येऊन तीला त्रास देणार नाही म्हणून पुन्हा सासरी घेऊन जायचे. त्यानंतर थोडे दिवस चांगल्या प्रकारे नांदले की पुन्हा तीला अधून-मधून म्हणायचे की, तुला स्वयंपाक चांगला येत नाही. तसेच तीच्यावर संशय घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत. 


सासू रंजना आणि सासरे राजू पंडीत हे तुझ्या घरच्यांनी लग्नाच्या वेळी आमचा मानपान केला नाही. असे म्हणून तीला नेहमी घालून पाडून बोलून शिवीगाळ करत असे. तसेच तुझ्या नावावर असलेले पैसे तुझ्या आई-वडीलांकडून घेऊन ये. त्यावेळी ती त्यांना म्हणायचे की, माझे आई-वडील गरीब आहेत, मी त्यांच्याकडून पैसे घेऊन येणार नाही. असे म्हणाल्यावर त्यांनी तीला शिवीगाळ, दमदाटी करून माझा शारीरिक आणि मानसिक छळ करून मला मारहाण करून घरातून काढून दिले. सासरच्या लोकांनी तीला व्यवस्थित रित्या नांदवावे याकरीता तीने अहिल्यानगर येथील भरोसा सेल येथे अर्ज केला. परंतु तेथे वाद मिटले नसल्याने तीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


रेशमा बाबासाहेब पंडीत रा. सडे, ता. राहुरी, या विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी पती बाबासाहेब राजु पंडीत, सासू रंजना राजु पंडीत सासरा राजु कचरु पंडीत सर्व रा. भावी निमगाव ता. शेवगाव, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ८३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.