Type Here to Get Search Results !

राहुरी | १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण.

 १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील एका १५ वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


या बाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि, त्यांच्या दोन मुली सकाळी शाळेत व त्या स्वत: मजूरीसाठी बाहेर गावी गेल्या असता त्यांची मोठी १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. शाळेत गेलेल्या दोन मुली शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर त्यांना पीडीत मुलगी घरी दिसली नाही.


तेव्हा पीडीत मुलीच्या चुलत भावाने पीडीतेच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलीचा घराच्या आजूबाजूला, गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. 


त्यामुळे तीचे कोणीतरी अपहरण केल्याची खात्री झाल्याने राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ८३०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.