वडगाव-धायरी परिसरात डायग्नोस्टिक सेंटर स्थापनेची मागणी
पुणे प्रतिनिधी:वडगाव धायरी परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे महापालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखान्यामध्ये डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी माजी नगरसेवक बाळासाहेब नवले व सारंग नवले यांनी केली आहे.
या सेंटरमध्ये अत्यल्प दरात एम.आर.आय, सिटी स्कॅन, एक्स-रे यांसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली. यासंदर्भातले निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना देण्यात आले.
नवले यांनी सांगितले की, धायरीसह परिसरातील नागरिकांना तपासणीसाठी लांब जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाच्या वैद्यकीय तपासणी सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल
