Type Here to Get Search Results !

राहुरी | देसवंडी येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 देसवंडी येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आज दि. २ ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव पार पडला. जयंती उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान देसवंडी गावचे जेष्ठ नागरिक दादा सकट हे यांना देण्यात आले.


कार्यक्रमाला उपस्थित समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री ना म साठे सरांनी व विद्रोही चळवळीचे डॉ. जालिंदर घिगे तसेच सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 


या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पिंटूनाना साळवे, पत्रकार आप्पासाहेब मकासरे, शाहीर सुरज पवार, सामाजिक कार्यकर्ते वसीम सय्यद, देसवंडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कुलदीप शिरसाठ, तुषार दळवी, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना तालुकाध्यक्ष सतीश भांड, तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने, लहुजी क्रांती सेना कार्याध्यक्ष सचिन नन्नवरे, देसवंडी शाखाध्यक्ष निलेश पवार, गुहा शाखा अध्यक्ष अमोल भांड व सुदर्शन भांड, विकास पेटारे, योगेश भांड, गणेश जगधने, सुनील जगधने, संकेत थोरात, गोरख जगधने, साईनाथ जगधने, मंगेश जगधने, अमोल जगधने, रवींद्र जगधने, अनिल जगधने, भीम आर्मी शाखाध्यक्ष दौलत गायकवाड, गणेश चव्हाण, सचिन जाधव, व महिलावर्ग आणि समस्त ग्रामस्थ देसवंडी अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.