Type Here to Get Search Results !

राहुरी | गोटुंबे आखाडा येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 गोटुंबे आखाडा येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


या उपक्रमात सचिन सोळसे, शिवाजी ससाणे, विनोद साळवे, जिवन साळवे, रवि ससाणे, संजय भोसले, विजय ससाणे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. तसेच शाळेतील शिक्षिका कल्हापुरे मॅडम या सेवानिवृत्त झाल्या असता ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा सत्कार करत त्यांना निरोप देण्यात आला.


या कार्यक्रमा वेळी गोटुंबे आखाडा येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे उमेश बाचकर, रवींद्र चौधरी, रामदास नेटके, रमेश खेमनर, रवी शिंदे, दत्तात्रय खेमनर, दिलीप जाधव, जालिंदर गडधे, बिलाल शेख, मन्सूर शेख, संतोष तोडमल, नवनाथ शेटे, अंकुश दवणे, अक्षय डहाळे हे मान्यवर उपस्थित होते.


या उपक्रमा बद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर मॅडम, मोरे मॅडम, साळवे मॅडम, कमळापुरकर मॅडम, निमसे मॅडम, कांबळे मॅडम आणि कल्हापुरे मॅडम यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच यापुढेही शाळेसाठी नवनवीन उपक्रम राबवावेत. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.