Type Here to Get Search Results !

अहिल्यानगर : अतिवृष्टीग्रस्त भागाची खा. लंके, मा. मंत्री तनपुरे यांनी केली पाहणी

 पंचनाम्या अगोदर तात्काळ मदत द्या 


खासदार नीलेश लंके यांची ठाम मागणी


अतिवृष्टीग्रस्त भागाची खा. लंके, मा. मंत्री तनपुरे यांनी केली पाहणी


खा. लंके यांच्याकडून आपत्तीग्रस्तांना किराणा किटचे वाटप 



अहिल्यानगर : प्रतिनिधी 


     लोकांनी आयुष्यभराच्या कष्टाने उभे केलेले संसार एका रात्रीत उध्वस्त झाले आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झाली तरी लोकांना आता मदतीची गरज आहे. कागदी अहवाल तयार होईपर्यंत लोक उपाशी राहणार का ? शासनाने तात्काळ आर्थिक मदत व साहित्याची मदत करावी. वाळकी परिसरातील पूवच्या  आपत्तीप्रमाणे फक्त नोंदी करून काम संपवू नका असे सुनावत खा. नीलेश लंके यांनी आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीची आवष्यकता असल्याचे ठामपणे सांगितले. 

     तिसगांव परिसरात दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने कहर केला. परतीच्या या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला. रस्ते वाहून गेले. पाण्याच्या प्रवाहात घरे पाण्यात वाहून गेली. शेतजमीनीवरील पिके संपूर्णपणे नष्ट झाली. आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्यासाठी खा. नीलेश लंके यांनी मंगळवारी सकाळीच तिसगांव  तसेच इतर आपत्तीग्रस्त भागाकडे मा. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह धाव घेतली. आपत्तीग्रस्त कुटूंबांची घरे, शेतजमिनी, वाहून गेलेले रस्ते यांची पाहणी त्यांनी करत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. 


     अतिवृष्टीमुळे या भागातील नागरिक उध्वस्त झाले आहेत. लोकांनी पन्नास, पन्नास वर्षे कष्टाने उभे केलेले एका रात्रीत उध्वस्त झाले. नुकसानीने पंचनामे झालेच पाहिजेत कारण त्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही. पंचनामे झाल्यानंतर बाधितांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. पंचनामे होतील मात्र सध्या आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीचे अपेक्षा असून प्रशासनाने त्यांनी ती करावी अशी आमची मागणी आहे.