Type Here to Get Search Results !

राहुरी - दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून भाऊसाहेब बाचकर यांना बेदम मारहाण

 दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून भाऊसाहेब बाचकर यांना बेदम मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


मला दारु पाज नाहीतर, दारु पिण्याकरीता पैसे दे, असे म्हणत आरोपीने भाऊसाहेब बाचकर यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व काहीतरी लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वावरथ येथे दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.


भाऊसाहेब कृष्णा बाचकर, वय ४५ वर्षे, धंदा शेती, रा. वावरथ, गंगाधरवाडी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊसाहेब बाचकर हे दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जांभळी गावचे चौकात थांबले होते. 


तेव्हा भाऊसाहेब बाचकर यांच्या ओळखीचा गौतम बर्डे हा तेथे आला. त्यावेळी म्हणाला की, मला दारु पाज नाहीतर, दारु पिण्याकरीता पैसे दे. तेव्हा भाऊसाहेब बाचकर हे त्याला म्हणाले की, मी शेतातुन आलो आहे व माझेकडे पैसे नाहीत, असे म्हणाले. 


त्याचा राग त्याला आल्याने त्याने भाऊसाहेब बाचकर यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व काहीतरी लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच तु जर पोलीस स्टेशनला जावुन माझी तक्रार केलीतर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. 


भाऊसाहेब कृष्णा बाचकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी गौतम आण्णा बर्डे, रा. वावरथ, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजी. नं. १०५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.