Type Here to Get Search Results !

राहुरी - दारुचे लायसन्स काढण्यासाठी माहेरहून २ लाख रुपए घेऊन यावेत, या मागणीसाठी विवाहितीचा छळ

 दारुचे लायसन्स काढण्यासाठी माहेरहून २ लाख रुपए घेऊन यावेत, या मागणीसाठी विवाहितीचा छळ. 



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


दारुचे लायसन्स काढण्यासाठी माहेरहून २ लाख रुपए घेऊन यावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या बाबत सासरच्या लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


पुजा सागर गायकवाड, वय ३१ वर्षे, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपुर, ह. मु. कोपरे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पुजा गायकवाड यांचा विवाह दि. ४ मे २०१७ रोजी बोरी फाटा वांजुळपोई, ता. राहुरी येथे सागर काळु गायकवाड, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपुर याचे सोबत झाला होता. 


लग्ना नंतर सुमारे तीन महिने सासरकडील लोकांनी पुजा गायकवाड यांना चांगले नांदविले. त्यानंतर पुजा यांचा पती नेहमी रात्री अपरात्री फोनवर बोलत असत म्हणुन पुजा यांनी पतीला ऐवढा वेळ कोणा सोबत बोलता असे विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे देवुन शिवीगाळ करत असत. परंतु पतीचे फोनवर बोलने जास्तच वाढल्याने पुजा यांनी पतीचा मोबाईल चेक करण्यासाठी माघीतला असता पतीने मोबाईल चेक करण्यासाठी दिला नाही. म्हणून पुजा यांना खात्री झाली की, पतीचे बाहेर कोणा सोबत प्रेमसंबध आहेत.


पुजा यांनी पतीला त्या बाबत विचारपुस केली असता पती दारु पिउन आला व शिवीगाळ करुन मारहाण केली व म्हणाला तुला इथे नांदवयाचे असेल तर तु मला कशाला विरोध करायचा नाही. तसेच पुजा यांची सासू त्यांना शिवीगाळ करुन घालुन पाडुन बोलत असे. तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असे. 


त्यानंतर तुला येथे नांदवयाचे असेल तर तु तुझे आई वडीलांकडुन दारुचे लायसन्स काढण्यासाठी दोन लाख रुपये घेवुन ये, असे म्हणून शिवीगाळ करु लागले. तु जो पर्यंत पैसे आणत नाही, तो पर्यंत आम्ही तुला येथे नांदवणार नाही असे म्हणुन पुजा यांना उपाशी पोटी घरातुन काढुन दिले.


सासरच्या त्रासाला कंटाळून पुजा सागर गायकवाड यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून पती- सागर काळु गायकवाड, सासू- मंगल काळु गायकवाड, दोघे रा. महाराना प्रताप कॉलनी, शिरसगाव, ता. श्रीरामपुर यांचे विरुध्द गुन्हा रजि. नं. १०४८/२०२५ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.